समलैंगिकता आणि समाज.

नुकतेच पुण्यात समलैंगिकतेवर लोकपंचायतीचे आयोजन करण्यात आलेले होते. एका संस्थेने ते आयोजित केले होते.

त्यासंबधीची बातमी आज सकाळच्या अंकात आली आहे. त्या पंचायतीत समलैंगिक संबंध ठेवणार्या पाच जणांनी आपल्या समस्या

मांडल्या. सकाळच्या बातमीत त्यातली विविध मते देण्यात आलेली आहेत. हे वाचल्यानंतर मनात जे विचार आले ते मांडत आहे.

१)  ही समलैंगिकता पुढे वाढत राहणार का?

२)  आपला समाज त्यामुळे विस्कळीत होईल का ?

३)  यामुळे आपली लग्नसंस्था धोक्यात येईल का ?

४)  एखाद्या विवाहित पुरुषाने असे संबंध ठेवणे समाजाला रुचेल का)

५) ह्या व्यक्तींना समाजात कोणते स्थान असेल.

अजुनही बरेच प्रश्न आहेत पण विस्तारभयास्तव जास्त लिहू शकत नाही .

 क्रुपया या विषयावर आपले मत कळवा.