मनोगत आता चालता बोलता अर्थात मोबाईलवर मनोगत !

प्रिय मनोगतींनो,
अशातच मी नवीन मोबाईल खरेदी केला - नोकिया ई-६३ , आणि त्यावर ऑपेरा मिनी ब्राऊसर चढवला, आणि महाजालावर भटकताना असे लक्षात आले की, युनिकोडीत देवनागरी अगदी सुरेखपणे त्यात दिसते आहे - लगेच मनोगतावर आलो, तर काय अगदी व्यवस्थीत वाचता आले ! तेव्हा म्हंटले सर्वांना ही बातमी सांगून टाकावी झालं!

तेव्हा ज्या मनोगतींकडे नोकिया चे सिरिज-६० ( २ रा वैशिष्ट्य समूह) फोन आहेत, आणि महाजालाची जोडणी आहे, ते मनोगत कुठेही वाचू शकतात - ऑपेरा मिनि चकटफू मिळतो बर्का !

तृषार्त