शिस्त ?

आजच्या बातम्यांमध्ये "आकृती भाटीया" बद्दल वाचले. दम्यामुळे बिचारी मुलगी प्राणाला मुकली. तिला दम्याचा त्रास होवू लागला तेंव्हा शाळेने तिला ऑक्सिजन लावला अन ती जेंव्हा तिच्या घरून आलेल्या कारमध्ये जावू लागली तेंव्हा तो ऑक्सिजन मास्क परत खेचला. म्हणे "ती शाळेची प्रॉपर्टी आहे? "

यापुर्वी शिक्षकांनी अत्याचार केल्याचा घटना इतर शाळातून आल्या होत्या, पण निष्काळजीपणाची ही बहुदा पहिलिच घटना असावी ज्यात विद्यार्थीनीचा मृत्यू झाला.

आता याला जबाबदार कोण याची चौकशी पोलिस करत आहेत.

दरम्यान ही एक अति महागड्या शाळांपैकी एक शाळा असल्याचे कळते.

शाळेने रुग्णवाहीका बोलवयचे सोडून पालकांना बोलावले आणि त्यांची वाट पाहीली. असाच प्रसंग मी लेक्चरर असतांना घडला होता. त्यात "त्या" मुलीला कोणाच्या गाडितून घरी सोडावे यासाठी प्राचार्य व डीन स्तुडंट अफेअर मध्ये ३ तास चर्चा झाली. शेवटी एका प्राध्यापकाने स्वतःच्या गाडिने तिला डॉक्टरकडे नेले, औषधाचे पैसे दिले आणि घरी सोडले.

पैसासाठी आपण मुल्य हरवून बसलो आहे का ? का शाळेची शिस्त म्हणून विद्यार्थ्यांना निष्काळजीपणे हाताळायच ?