स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक मान का वेळावतात?

संभाषण करताना देहबोली महत्त्वाची असते. त्यामुळे हातवारे करणे, चेहऱ्यावर विविध हावभाव प्रदर्शित करणे वगैरे गोष्टी नैसर्गीक आहेत.

मात्र, संभाषण करताना पुरुषांपेक्षा तुलनेने स्त्रिया मान जास्त का वेळावतात? त्यांचे म्हणणे त्याचमुळे ठासून बोलले जाईल असा समज असतो की ते नैसर्गीक आहे?

( यात, स्त्रियांचे मान वेळावणे हे मोहक वगैरे असते हे मला 'एक स्वत:ला कवी समजणारा' म्हणून ज्ञात आहे, मात्र चर्चाप्रस्तावाचा रोख वेगळ्या दिशेने आहे. ती क्रिया नैसर्गीक असते की त्यात आपल्या बोलण्याला महत्त्व मिळावे हा हेतू असतो... असा)

( अवांतर - असे काही नसतेच असे समजले जात असेल तर प्रश्नच वेगळा. )

( प्रस्तावाचा हेतू - जर 'मान वेळावणे' वजा केले तर स्त्रियांच्या बोलण्याचे हेतू साध्य होणार नाहीत असा निष्कर्ष निघत असेल तर काही स्त्रियांचे बोलणे परिणाम्शुन्य करण्याचा एक मार्ग उपलब्ध होऊ शकतो हे दाखवणे. )