किती धीर ठेवू?

सदिच्छा कुणाची मिळावी मलाही
'तिरस्कार वाटू नये आपला' ही

कधी मी तिचा साज होतो गळ्याचा
कधी चालतो ना तिला मेखलाही

किती वाट पाहू? किती धीर ठेवू?
कधी जायची जिंदगीची बला ही?

कशाला असे प्रेम ओढायचे मी?
किती संकटे ही तुलाही, मलाही!

अरे काल झाला असे जन्म माझा
जगावे म्हणेतोवरी संपलाही