सी. बी. आय. आणि विश्वासार्हता

सी. बी. आय. ही संस्था आजकाल वाद्ग्रस्त झाली आहे. महत्त्वाचे गुन्हे जसे चारा घोटाळा, बोफोर्स, ताज, मिठारी, शीख दंगली ह्या सारख्या अनेक प्रकरणांमध्ये सी. बी. आय. चा तपास समाधांकारक नाही. चिदंबरम म्हणतात की सी. बी. आय. वर सरकारचे नियंत्रण नाही. पण तसे वाटत नाही. सी. बी. आय. च्या कार्भारात सरकारचे (कोणत्याही) हस्तक्षेप असतातच. काही प्रकराणांत सी. बी. आय. ने वेळेवर आरोपपत्र दाखल केलेले नाही (जसे मिठारी हत्याकांड). २० वर्षे प्रकरण चालल्यावर अचानक क्वात्रोचीवरील पुराव्वे सी. बी. आय. ला सापडेनाशे झाले. कहर म्हणजे त्यांचे पुर्वीचे कप्तान म्हणतात की खोलीभरून पुरावे होते.

अशा गोष्टींमुळे सी. बी. आय. ची विश्वासर्हता कमी झाली आहे असं मला वाटत आणि सी. बी. आय. चौकशी म्हणजे निव्वळ नाटकच उरलं आहे. क्रुपया मनोगतींनी आपलं मत मांडावं.