आय. पी. एल.

आयपीएलची जत्रा भरल्यावर माझ मन मला स्वस्थ बसू देईना. तंव्हा तडक अफ्रीकेत जाऊन पोहोचलो!!! नुकतेच त्या दिवशीचे सामने संपले होते. राजस्थानला बंगलोरने, पंजाबला दिल्लीने, कोलकाताला डेक्कनने हरवलं होतं. सगळे खेळाडू, सितारे हॉटेलमध्ये परतले होते. मी पण त्यांना सामील झालो.

सगळ्यात पहीले मला प्रीती भेटली. कोपऱ्यातल्या टेबलवर उदास होऊन बसलेली होती.

"प्रीती अगं खेळात हार-जीत चालतेच!!! "

"नाही रे!!! मला हारल्याच काहीच नाहीये!!! मी जाम बोअर झाले आहे!! " मला आजू-बाजूला नेस वाडीया दिसत नव्हता.

"अगं नेस कुठे आहे?? तो नाहीये म्हणून तू नाराज आहेस क? "

"नाही. उलट मीच त्याला मी उकडीचे मोदक आणायला पाठवलं आहे. "

"तू कधी मोदक खाल्ले? "

"मला सचिनने खाऊ घातले. गणपतीचा प्रसाद म्हणून. मला खूप आवडले!!!"

"पण नेसला अफ्रीकेत उकडीचे मोदक थोडीच मिळणार आहेत? "

"म्हणूनच पाठवलं!!! मला फार पकवत होता. सारखा मागे-मागे करत होता. "

"मग आता तू काय करणार? "

"हो ना!! तोच प्रश्न आहे! "

"युवराजला बरोबर घे! "

"नको त्याची आई लगेच काहीतरी गडबड करते. नाहीतरी तो पण बोअर आहे. बघ कसा बसला आहे तिकडे. उदास चेहरा करून. ली असतातर किती बरं झालं असतं गेला बिचारा परत." मी बघितलं तर खरच युवराज उदास चेहरा करून बसला होता. मी लगेच प्रीतीला बाय करून तिकडे गेलो.

दुसऱ्या टेबलवर युवराजसिंग शुन्यात नजर लाउन बसला होता. त्याल म्हंटल अरे एक मॅच हरली म्हणून नाराज नको होऊस. मी असं म्हंटल्यावर एकदम रडायलाच लागला. हा पंजाब-दा-पुत्तर रडतांना बघून मलापण गलबलून आलं. म्हंटलं अरे काय झालं सांगशील का काही?

"मला सांग, मी कसा आहे? "

"तू एक जगातील ऊत्र्कूष्ट फलंदाज आहेस. "

"अ हं. ते मला माहीत आहे. "

"मग? "

"मी कसा दिसतो? "

"हँडसाम!!! का रे असं विचारतो? "

डोळे पुसत मला म्हणाला. "मला परत एक मुलगी सोडून गेली. ही प्रीती पण लाईन देत नाही. नुसती ली ली करत असते."

"अरे मग नाराज का होतोस. येईल दुसरी. "

"दर वेळेस असेच होतं. हात को आया मूं ना लगाया!! "

"म्हणजे? "

"बघ ना मी कीमला पटवलं, तर आईने आमची मैत्री तोडली. दिपिकाला पटवलं तर मध्येच धोणी आणि रणवीर आले. हा धोणी तर प्रत्येक ठिकाणी टांग अडवतो. मी उप-कर्णधार होणार होतो. तो झाला. नंतर मला कर्णधार करणार होते. पण त्याला केलं. कसोटीतून पण त्याने मला काढलं. मला सांग कोण गोलंदाजांची धुलाई करतो? "

"अर्थातच तू!! "

"त्याला कॅप्टन कूल म्हणतात. आतली गोष्ट तूला मी सांगतो. त्याला काय करावं तेच समजत नाही. म्हणून तो काहीच करत नाही. समोरचा आपोआप बाद होतो. सचिन आणि मी खेळतो म्हणून आपण जिंकतो. "

"होशील रे तू कर्णधार, बस्स असाच खेळत राहा. " मी असं बोलल्यावर युवराज एकदम खूष झाला. मला डिस्कोचा पास दिला. मी पण सरळ तिकडेच निघालो.

आतमध्ये शिरल्यावर मला एक ओळखीचा चेहरा नाचतांना दिसला. अरे हा तर श्रीसंत. १० मिनीट त्याचा विनोदी नाच बघता बघता माझी छान करमणूक होत होती. अचानक त्याने 'ईंडीयन म्यूझीक' ची फर्माईश केली. डी. जे. लगेच त्याचं एकलं.

नाचता-नाचता अचानक त्याने दोन्ही हात गालांवर घेतले आणि संमोहन झल्यासरखा उभा राहीला. एकच गलका झाला. लोकं श्रीसंत कडे जायच्या एवजी डी. जे. कडे गेले. त्याने काहीतरी केलं आणि गाणं बंद पडलं. १-२ मिनीट झाल्यावर श्री पण 'नॉर्मल' झाला. मी हळूच एकाला काय झालं ते विचारलं.

"अहो काय सांगू? हा जेव्हापासून त्या भज्जीने त्याला थप्पड मारली तेव्हा पासून हा सगळ्या सरदार लोकांना घाबरतो.

आजुबाजूला बघत मी म्हंटलं "अरे इथे तर कोणीच सरदार नाही!! "

"हो, पण त्या मुर्ख डी. जे. ने सिंग ईज कींग लावलं ना. त्याचा परीणाम!!! "

श्री ला परत नाचतांना बघत मी तिथून निघालो. तिथे जवळच बार होता. आतमध्ये गेलो तर एका टेबलपाशी खूप धूर दिसला. पहीले वाटलं की आग वगैरे लागली असेल. बघितलं तर आपला शाहरूख!!! स्वतः आपले 'विजयशेठ' आणि 'टीम' त्याला काय हवं-नको ते बघत होते.

"काय डॉन परत देवदास काढणार का? "

झिंगलेल्या शाहरूखने "उं ऽऽऽऽ आं ऽऽऽऽउं ऽऽऽऽ आं ऽऽऽऽ" असं काहीसं केलं. काहीतरी समजून टीम मधल्या एकीने बर्फाचे दोन खडे त्यच्या ग्लासमध्ये टाकले.

"अरे चिअर लिडर निवडण्यापेक्षा तुझी टीम मैदानावर गेली असती तर आज तू जिंकला असता रे. "

उत्तरादाखल त्याने परत "उं ऽऽऽऽ आं ऽऽऽऽउं" केलं, परत दोन खडे ग्लासमध्ये पडले. वैतागून मी उठून गेलो.

अचानक मला कोणीतरी खेचलं.

"मी जॉन बुकानन. तूच करण जोहर का? "

"नाही!! "

जॉन एकदम हताश झाला. "तूला करण जोहर माहीत आहे का? "

मी हो म्हंटलं. "का रे? तूला करण जोहर का हवा आहे? "

"मला सांग करण जोहरने कोणते ईंटर नॅशनल खेळाडू तयार केले आहे? कोणत्या टीमचा तो कोच आहे? "

मला जोर-जोऱ्यात हसतांना बघून तो माझ्यावर चिडला!

"अरे तूला कोणी सांगितलं असं? "

"अरे मी असं एकलं की शाहरूख त्याला भारतातून आणून त्याला अमच्या टीमचा कोच बनवणार आहे. "

आता मात्र मला हसू आवरेना. करण जर कोच झाला तर खेळाडू कसचा सराव करतील त्याची कल्पना केल्यावर तर मी अजून हसायला लागलो. मला असं हसतांना बघून तो अजून गोंधळला.

"अहो जॉनराव करण हा/ही/हे खेळाडू नाही. तो चित्रपट काढतो. " जॉनचा चेहरा बघण्यालायक झाला. मी तिथून लगेच सटकलो.

बाहेर पडलो तर धोणी एक हातात दुधाचा ग्लास आणि बॅट घेऊन दिसला. अरे पण हे काय? तो बॅटला दुध लाऊन तिला दगडावर का घासतो आहे?

"अरे माही हे काय चालू आहे? " मी विचारलं

"अरे बरं झालं आलास. मला थोडी मदत कर. "

"हो करतो पण तू काय करतो आहेस? "

"अरे मी बॅटला धार लावतो आहे. "

"बॅटला धार??? "

"हो बॅटला धार!!! आज गावसकरने पेपरमध्ये लिहीलं आहे की माझ्या बॅटची धार गेली आहे.   म्हणूनच कदाचित माझे रन होत नाही. मला सांग माझ्या बॅटला धार झाली आहे का? " बॅट दाखवत मला माहीने विचारलं. मी हसू दाबत त्याला म्हंटलं.

"अरे तू धार का लावत बसला आहेस???? "

"मग काय करू?? "

"हे बघ, तेंडूलकरच्या धावा होतात म्हणजे त्याच्या बॅटला चांगलीच धार असेल"

"हो!! "

"मग तू त्याचीच बॅट का नाही घेत? "

"भन्नाट आयडीआ. मी आत्त्ताच जातो. "

धोणीची अवस्था बघून मला भारतीय टीमची काळजी वाटायला लागली. आपल्या टीमचं काय होईल कोणास ठाउक. युवराज सिंग मुलीचा हात हातात घेऊन आणि धोणी  'धार लावलेली' बॅट घेऊन 'कोच' करण जोहर च्या तालावर नाच (हो नाच च. नाहीतर काय क्रिकेट खेळणार? ) करतो आहे, श्रीसंत गालावर हात ठेवून ब्रेक डांस आणि त्याच्या बाजूला भज्जीचा भांगडा!!!! हे देवा आता तूच काहीतरी कर!!

 समोरच्या मैदानात कोणीतरी सराव करत होतं. लांबून पण ती व्यक्ती ओळखू येत होती. त्या व्यक्तीला पाहून माझी सगळी काळजी मिटली. ती व्यक्ती म्हणजे आपला 'तेंडल्या' होता!! देवाने माझी प्रार्थना एकली असावी. साक्षात क्रिकेटचा देव मला दर्शन देत होता. त्याने मारलेला चेंडू थेट माझ्या पाया पाशीच पडला होता. खरच तो असतांना कसचीच काळजी नाही.

(क्रमशः)