लोकसभा निकालाचा अन्वयार्थ

१५व्या लोकसभेचा निकाल नुकताच हाती आला आहे.

काहींना अपेक्षित, काहींना अनपेक्षित असा हा निकाल आहे. काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तास्थानी विराजमान झाली आहे.
या निवडणूकीत महागाईपासून भ्रष्टाचारापर्यंत आणि दहशतवादापासून शेतकरी आत्महत्यांपर्यंत अनेक मुद्दे हाताशी असूनही, भाजपा आणि इतर विरोधकांना यश आले नाही.

काँग्रेस पक्षाकडे असे काय आहे, की वारंवार लोक त्यांना मते देतात?
"अँटी-इंकंबसी फॅक्टर" चा प्रभाव का पडला नाही?
सर्वसामान्य भारतीय माणूस 'भाजपीय' विचारधारा स्वीकारत नाही, असे वाटते का?

असे काही प्रश्न पडले आहेत.

मनोगतीय परंपरेनुसार अभ्यासपूर्ण मते अपेक्षित आहेत.