हा आहे रेशमी
हा आहे रेशमी ।
केसांचा अंधेरा, न तू दूर हो ॥
आहे गंध जिथवर, माझ्या कुंतलांचा ।
ये आकर्षुनी ॥ धृ ॥
ऐक रे, हे पाहा ।
आहे सत्य तेच, मी सांगते ॥
उघडच वा लपत ।
गर्दवर्णी ह्या, ओठांशपथ ॥
उजळतील हे दिवे, काजव्यांच्या परी ।
ह्या स्मितांचा तर, स्वीकार कर ॥ १ ॥
तहानली, ही नजर ।
ही काय सांगायची गोष्ट आहे ॥
पाहुणा, आहेस तू ।
तर का न, ही रात थांबायची ॥
रात ढळती असो, तू हृदी राहा माझ्या ।
माझ्या मनीची, मनीषा बनून ॥ २ ॥
नरेंद्र गोळे २००९०५२९
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
छान
प्रे. मिलिंद फणसे (शनि., ३०/०५/२००९ - ०७:०७).
छान/सुचवणी
प्रे. जयन्ता५२ (सोम., ०१/०६/२००९ - १९:४६).
मिलिंदजी आणि जयंतराव आपल्या प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!
प्रे. नरेंद्र गोळे (शुक्र., ०५/०६/२००९ - ०५:२४).