गझलेची बाराखडी !

प्रदीप कुलकर्णी यांची 'समाधी' ही नितांतसुंदर गजल वाचली. या गजलेतील खाली दिलेल्या शेराबद्दल एक शंका आहे.

प्रत्येक समुद्रातील परीला द्याया...
घेऊन फुले मी सात निघालो आहे

माझ्या समजुतीप्रमाणे प्रत्येक शेरामधली प्रत्येक ओळ ही स्वतंत्र असली पाहिजे. या शेरामधली पहिली ओळ पाहिली तर ती एक स्वतंत्र ओळ वाटत नाही.  ती अर्थाच्या दृष्टीकोनातून अर्धवट वाटते. हे गझलेच्या व्याकरणाच्या दृष्टीकोनातून बरोबर आहे कां ?

तज्ञांनी कृपया मार्गदर्शन करावे.

आपला

फिनिक्स