प्रेम

व्यापकाला समजण्याला सूक्ष्म झाले पाहिजे
त्याचसाठी फक्त.. करता प्रेम आले पाहिजे

तू असावे की नसावे प्रश्न हा उरतो कुठे?
अंत दोन्ही एक रेषेचे... कळाले पाहिजे !

सोडले मी जन्म लाखों प्रेम कळण्याला तुझे...
आणखी आता किती अजुनी जळाले पाहिजे?

'राख' उलटूनी 'खरा' येतोच प्रत्यय जीवनीं
जाणण्या हे.. प्रेम थोडेसे निवाले पाहिजे

मान खाली घालुनी ती लाजते की सांगते..
रत्न मिळण्या सागरामध्ये बुडाले पाहिजे !

काळजावर प्रेयसी रेखाटण्या आतूर मी..
काय सांगू.. प्रेम आधीचे उडाले पाहिजे !