ओपन ऑफिसमध्ये शुद्धलेखन चिकित्सा

ओपन ऑफिस चे अगदी अलिकडील संस्करण स्थापित करून आपण त्यात मराठी शुद्धलेखन तपासू शकता. ओपन ऑफिस हा मायक्रोसॉफ्ट ऑफिससारखाच संच आहे.
http://openoffice.org
त्यात "वर्ड"च्या ऐवजी रायटर मिळतो इतकेच. वर्डची सवय झालेल्यांना थोडे वेगळे वाटेल पण लवकरच रायटरशीदेखील दोस्ती होईल. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मराठी शुद्धचिकित्सा कशी करतात ते मात्र मला माहित नाही.
मराठी डिक्शनरी खाली दिलेल्या दुव्यावरून उतरवून घ्यावी.
http://extensions.services.openoffice.org/project/dict-mr
इन्स्टॉल करण्याकरता डबल क्लिक पुरे. "लायसन्स ऍग्रीमेंट" पूर्ण न वाचताच शेवटपर्यंत स्क्रॉल करून "ऍक्सेप्ट" करावे.
रायटर बंद करून पुन्हा चालू करावा. यात काही मराठी मजकूर टाईप करावा किंवा एखाद्या ब्लॉगवरून कॉपी पेस्ट करावा. रायटर हा इतर सर्व सॉफ्टवेअरप्रमाणेच निर्बुद्ध असल्यामुळे मराठी मजकुराचे शुद्धलेखन तपासावयाचे आहे हे त्याला सांगावे लागते. त्यासाठी,
१) टूल्स - ऑपशन्स - लेंग्वेज सेटींग - लेग्वेज
२) "एनएबल फॉर कॉम्लेक्स टेक्स्ट लेआउट" चेक बॉक्स मार्क करावा.
३) डीफॉल्ट लेंग्वेज फॉर डॉक्युमेंट्स यातील "सीटीएल" ड्रॉप डाऊनमध्ये मराठी निवडा.
४) आपल्याला फक्त एकाच फाईलमधील शब्द तपासावयाचे असतील तर "फक्त या पानापुरतेच" या अर्थाचा ऑप्शन निवडा.

आता आपल्याला इंग्रजीप्रमाणेच मराठीतही स्पेलचेक करता येईल.
मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, पण तिचा लाभ जेव्हा इंटरनेट जोडणी शक्य असेल तेंव्हाच घेता येतो. दुसरे म्हणजे त्यासाठी येण्याची नोंद करावी लागते व काही वेळा ही सुविधा खूपच वेळ घेते. ओपन ऑफिसमध्ये असे काहीच बंधन नाही. शिवाय वारंवार येणारे शब्द आपल्या खासगी डिक्शनरीत साठवून ठेवणे, स्वयंसुधारणेसाठी शब्द जमवून ठेवणे अशा अनेक गोष्टी करता येतात.