मूगगाठी

  • २ वाट्या चांगले मोड आलेले मूग, १ टे. स्पून तांदळाची पिठी, २ आमसुले, ५-६ सुक्या लाल मिरच्या,
  • ४-५ काळ्या मिरीचे दाणे, २ टीस्पून धने, अर्धा खोवलेला नारळ, फोडणीचे साहित्य, कढिलिंब, मीठ, तेल.
२० मिनिटे
२-३ जणांसाठी

मोड आलेले मूग रात्री पुन्हा पाण्यात भिजवावेत. सकाळी साले काढून बिरड्या काढाव्यात. हे सोललेले मूग व कढिलिंब थोडे पाणी घालून शिजवून घ्यावेत. लाल मिरच्या, धने, मिरे कोरडेच भाजून घ्यावे व ओल्या खोबऱ्याबरोबर वाटून घ्यावे. मूग फोडणीस घालून जरा परतावेत. मग त्यात वाटलेला मसाला, मीठ, आमसुले घालावीत. तांदळाची पिठी थोड्या पाण्यात कालवून लावावी म्हणजे रस दाट होतो. जरा वेळ उकळवून मग उतरावे.

नाहीत