अवियल

  • १५० ग्रॅ. मद्रास सुरण
  • ६-७ फ़रसबी
  • १ बटाटा
  • १ गाजर
  • १ शेवग्याची शेंग
  • २ वाटया दही किंवा ताक
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • १/२ बोटाएवढं आलं
  • १ चमचा जीरं
  • ४ चमचे नारळाचा किस..
  • कढिपत्ता
  • १/२ चमचा नारळाचे किंवा गोडे तेल
  • हळद
१५ मिनिटे
२ जणं
  • सुरण धुऊन त्याचे उभे मध्यम बारीक काप करावेत.
  • फरसबी बारीक चिरून घ्यावी.
  • बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा नेहमी प्रमाणे चिराव्या.
  • गाजराचे उभे काप करावेत.. (अर्ध्या बोटाएवढे)
  • कढई ता नेमके पाणी घेऊन या सगळ्या भाज्या उकळायला ठेवाव्यात...
  • हिरव्या मिरच्या, जिरे, आलं, नारंळ . मीरे आणि चवीप्रमाणे मीठ यांची पेस्ट तयार करावी..
  • भाज्या उकळल्यावर, थोडे पाणी कढईत ठेवून बाकीचे(जास्त असल्यास) टाकून  द्यावे..
  • तयार केलेली पेस्ट कढईत घालावी आणि २ मिनिटे हालवावे
  • दह्याचे ताक करावे आणि त्यात थोडीशी हळद घालावी.
  • हे ताक कढईत टाकावे..
  • वरून दोन ते तीन कढीपत्त्याची पाने घालावीत
  • २ चमचे साधे किंवा नारळाचे तेल घालावे.
  • २ मिनिटांनंतर आचे वरून काढावे..

  • अवियल हा मलयाली पदार्थ आहे.
  • गरम भाताबरोबर किंवा फुलक्याबरोबर या पदार्थाची गट्टी छान जमते.
  • यात तोंडली, वांगी, दुधी भोपळा अश्या अनेक भाज्या टाकता येतात.
  • वर लिहितांना मद्रास सुरण असे लिहिले आहे कारण दोन प्रकारचे सुरण महाराष्ट्रात मिळते. साध्या सुरणाला चिरून चिंचेच्या पाण्यात घालून ठेवतात‌ घश्याला खाज येऊ नये म्हणुन...
  • आपण महाराष्ट्रातही कोहळ्याची, किंवा दुधीची दह्याची भाजी करतो.. पण वरून हिंग, मिरची, हळद अशी फोडणी घालतो..
  • तसाच हा पदार्थ आहे.. पण ह्यात असलेल्या हिरवी मिरची, आलं आणि जिऱ्याच्या स्वादाने ही भाजी चमचमीत लागते..
  • नारळाच्या तेलाने थोडासा केरळचा फील येतो..

इंटरनेट