अल झिंगारा

  • फुसिलोनी पास्ता २५० ग्राम
  • १ मध्यम कांदा
  • १ पिवळी भोपळी मिरची
  • १ लाल भोपळी मिरची
  • १ मूठ मटारदाणे
  • ३,४ लसूण पाकळ्या
  • १.५ ते २ चहाचे चमचे मिरपूड
  • चवीनुसार मीठ
  • १ हिरवी मिरची बारीक चिरून
  • ५,६ ऑलिव्ह, २ चमचे ऑलिव्ह तेल
३० मिनिटे
२,३ जणांना

पाणी उकळत ठेवा, त्यात चमचाभर मीठ घाला. आधण आले की पास्ता त्यात घाला आणि शिजवा. शिजल्यावर चाळणीवर टाकून पाणी काढून टाका आणि निथळत ठेवा.
कांदा उभा, लांब चिरा, लाल, पिवळी सिमला मिरची लांबट चिरा, लसणीच्या पाकळ्या बारीक चिरा, मिरची बारीक चिरा. ऑलिव्हज बारीक चिरा.
एका कढईत ऑलिव ऑइल ( उपलब्ध नसेल तर गोडेतेल) गरम करा. त्यावर कांदा टाकून परता, नंतर लाल, पिवळी मिरची घालून परता, मटार, ऑलिव्हज, हिरवी मिरची, लसूण घालून परता, भाजी शिजली की त्यात चाळणीत निथळत ठेवलेला पास्ता घाला आणि परता. मीरपूड व मीठ घाला आणि परता.

अल झिंगारा तयार आहे. गरम गरम खा!

फुसिलोनी पास्ता उपलब्ध नसेल तर पेन्नं किवा फार्फलं ह्या प्रकारचा पास्ता वापरुनही हा प्रकार करता येतो.

पास्त्याच्या पाकिटावर लिहिलेली पाककृती