केळाची सुकी भाजी (वाळक्काय पोरियल)

  • १ कच्चे केळ
  • १ चमचा धणेपूड
  • १ चमचा जीरेपुड
  • १ चमचा तिखट
  • १ हिरवी मिरची
  • कोथिंबीर..
  • १/२ चमचा तेल
  • चवीपुरता मीठ
१५ मिनिटे
२ जणं
  • केळाला सोलून घेऊन त्याचे पातळ चिप्स सारखे काप करावे.
  • हे काप तिखट, मीठ, धणे पुड जीरे पूड घालून पाच ते दहा मिनीटाकरीता मुरू द्यावे.
  • कढईत १ चमचा तेल गरम करावे
  • त्यात १/२ चमचा मोहरी घालावी, कढीलिंबाची ४-५ पाने घालावी, हिरवी मिरची उभी चिरून टाकावी..
  • नंतर हे केळीचे काप घालावेत.
  • वरून थोडा कोथिंबीर पेरावा...
  • झाकण लावून ५ मिनीटे शिजू द्यावे...

  • ही सुकी भाजी सांबार भातासोबत छान लागते.
  • नुसतीही खाता येते...
मिस्टर मुग्धमणी..;)