जून २६ २००९

टोमॅटो ची चटणी

जिन्नस

  • २ टोमॅटो
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • २-३ लसूण पाकळ्या
  • मीठ, साखर, जीरे पावडर चवीप्रमाणे

मार्गदर्शन

टोमॅटो गॅसवर भाजून घ्यावेत. हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून घ्याव्या. टोमॅटो गार झाल्यावर त्याची साले व बीया काढून घ्यावीत व एका भांड्यात उरलेला गर काढावा. हिरव्या मिरच्या थोड्या ठेचून घाल्याव्यात.लसूण पाकळ्या ठेचून घाल्याव्यात‌. चवीप्रमाणे मीठ, साखर, जीरे पावडर घालावे. हे सर्व एकजीव करावे. जास्त तिखट आवडत असल्यास मिरच्या आणखी घाल्याव्यात.

टीपा

ही चटणी थोडी तिखट , थोडी  आंबट असल्याने चवीला छान लागते.

मिक्सर मधून बारीक केली तरी चालते.

माहितीचा स्रोत

स्व-प्रयोग


छान

Typing help hide