जून
२६
२००९
जिन्नस
- १ पाव दूधी भोपळा
- घुसळलेले आंबट-गोड दही-१/२ वाटी
- मोहरीची डाळ - १ चमचा
- फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, तिखट
- मीठ, साखर चवीप्रमाणे
मार्गदर्शन
दूधी भोपळ्याच्या बारीक फोडी करून त्या उकळून घ्याव्यात. त्यातले पाणी पूर्णपणे निथळून घ्यावे. त्यानंतर त्यात घुसळलेले आंबट-गोड दही घालावे. मोहरीची डाळ घालवी. फोडणी करून त्यात घालावी. मीठ व साखर चवीप्रमाणे घालावे. सर्व नीट एकत्र करावे.
टीपा
भोपळ्याच्या फोडी उकळताना त्याचा लगदा होणार नाही याची काळजी घ्यावी.
माहितीचा स्रोत
आई
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.