जून
२६
२००९
दह्यातला पालक
प्रेषक अरुन्धती कुलकर्णी (शुक्र., २६/०६/२००९ - ०७:१५)
जिन्नस
- पालकाची ताजी पाने स्वच्छ धुवून चिरून २ वाट्या
- फेटलेले ताजे दही एक ते दीड वाटी
- पुदिन्याची पाने १०-१२ बारीक चिरून
- मिरपूड चवीनुसार
- मीठ / सैंधव चवीनुसार
मार्गदर्शन
पालकाची पाने चांगली १०-१५ मिनिटे मीठाच्या पाण्यात धुवून बारीक चिरून घ्यावीत. ज्यांना कच्चा पालक खायला आवडतो त्यांनी कच्चीच ठेवावीत, नाहीतर उकळत्या पाण्यात ५ मिनिटे ठेवून त्यांना वापरावे. दही फेटून त्यात मीठ, मिरपूड व पुदिना घालून पुन्हा फेटावे. सैंधव वापरल्यास अजून छान! त्यात पालकाची चिरलेली पाने घालून व्यवस्थित एकजीव करावे. आवश्यकतेनुसार गार करावे व वाढावे.
टीपा
काहीजण दह्यातल्या पालकाला तूप, जिऱ्याची फोडणीही देतात. काहीजण मिरपूड ऐवजी हिरव्या मिरच्या वापरतात. परंतु सर्वच पदार्थ हिरवे असल्याने अनेकदा मिरची दाताखाली येते, म्हणून त्याऐवजी मिरपूड.
माहितीचा स्रोत
आई
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
छान
प्रे. श्वेता१२३ (शुक्र., ०३/०७/२००९ - १०:०९).