ताकातली खिचडी

  • पाच कप ताक
  • दीड कप तांदूळ
  • १ टेबलस्पून (एकत्र) मूगडाळ, उडीदडाळ
  • कढीपत्त्याची पाने ८-१०
  • २ लाल मिरच्या
  • २ टेबलस्पून तेल/ तूप
  • चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार
  • अर्धा टीस्पून मोहरी व जिरे
  • काजूचे बारीक तुकडे ऐच्छिक
३० मिनिटे
३ माणसांसाठी

डाळी धुवून कोरड्या करून घ्या. तेल/ तूप गरम करून त्यात डाळी व काजू तुकडे तांबूस रंगावर परतून घ्या. त्यात मोहरी, जिरे घालून तडतडवा, कढीपत्ता, लाल मिरच्या व ताक क्रमाक्रमाने घाला. मीठ व धुवून ठेवलेला तांदूळ घालून मंद आंचेवर भात जरा मऊसर होईपर्यंत (थोडा जास्तच) शिजवा. वाढताना कोथिंबीर भुरभुरवा.

हवा असल्यास खवलेला नारळही वरून घालू शकता. अतिशय रुचकर, सौम्य व पचायला हलका पदार्थ. एकदम दाक्षिणात्य पद्धतीची चव!