कोणास ठाऊक

विवाह ह्या शब्दाचा अर्थच लोप पावत चाललाय असे वाटते. आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय?  विवाह म्हणाल तर दोन मनांचे मिलन, दोघांत
एक होण्याची कृती , विवाह म्हणजे समर्पण वगैरे वगैरे. 
             पण मला तरी वाटते कि विवाह म्हणजे समर्पण! अहो दोघा नवरा बायकोंनी तर ते करायलाच हवे पण त्यांच्यामुळे जी दोन घर जोडली
गेली त्यांचे सुद्धा आपाआपसात समर्पण हे अतिशय महत्त्वाचे आहे. दोन घर एकत्र आल्यावर त्यांच्यात थोडाफार तरी वेगळे पणा हा असणारच
पण तो जुळूवुन घ्यायला हवा. कोणतेही विचार अगदी टोकापर्यंत जाणार नाही ह्याची दक्शता घ्यायला हवी . ह्यात नवीन काय ?  पण आज बऱ्याच घरात अशांत वातावरण निर्माण होतय. एकमेकांच्या उणिवा दाखवल्या जाताय त्या टाळायला हव्यात. चुक जरी असेल तरी
ति नजर चुकिने तर घडली नाही ना ? हे हि विचारात घ्यायला हवय.
            आपल्या माणसांवर आपण जिवापाड प्रेम करतो ना मग समोरची पण आपली माणस समजायलाच हवी. कोणताही माणुस कधिही चुकू
शकतो मग आपली काय कथा! .  वैयक्तिक अहंकार हा बाजुला ठेवल्याने बऱ्याच उणिवा भरून येउ शकतात. मत आपली जरुर मांडावी पण ती
दुसऱ्यावर लादणे सोडायला हवे.
            आपण आपल्या सामाजिक जिवनात भरपुर लोकांचे मन सांभाळतो. ज्यांना कधी आपण पहिल्यांदाच पाहतो आणि परत कदाचित
भेटहि होणार नसते तरी आपण त्यांच्याशी वागतांना त्यांना जपत असतो., ह्यात कधी व्यावसाईक म्हणा, किंवा सामाजिक शिष्टाचाराचा भाग असतो पण हा शिष्टाचार  नेमका आपल्या माणसाच्या वेळेस कुठे जातो कोणास ठाऊक
             मी मात्र एवढेच म्हणेन कि आपण आपली माणस होईल त्या प्रकारे जपायला हवित!