वाढणारे वय आणि मृत्यूचे भय

प्रथम हे नमूद करावेसे वाटते की ही सासू सून चर्चा नाही. तुमच्याकडून मार्गदर्शन मिळावे म्हणून हे लिहीत आहे.

नमस्कार,

प्रथम थोडी पार्श्वभूमी सांगते. माझे सासरे ६ वर्षांपुर्वी बऱ्याच लांब आजाराने वारले. नंतर नवऱ्याला अमेरिकेत येण्याची संधी मिळाली. सासूबाई भारतात असतात. साधारण एक वर्ष नवरा अमेरिकेत राहिल्यावर त्याने भारतात शहरात मोठे घर घेतले. आधीची चाळ सोडून सासुबाई नवीन घरात गेल्या. अर्थात चाळीसारखी ब्लॉक ची दारं सतत उघडी नसली तरी सगळे शेजारी खूपच चांगले आहेत. सगळे संध्याकाळी ५ ते १० दार उघडं ठेवतात. एकमेकांशी गप्पा मारतात. जेवणातील काही पदार्थांची देवाण घेवाण करतात. रात्रीही १-२ वेळा शेजारचे काका आजारी पडल्यावर सगळ्यांनी त्यांना मदत केली. सासूबाईंना उच्च रक्तदाब आहे. बाकी त्या फक्त ५७ वर्षांच्या आहेत त्यामुळे व्यवस्थित राहतात. पण त्यांना सतत ही भीती वाटते की रात्री त्यांना काहीतरी होईल आणि त्या मरतील. कुणीही जवळ नसेल त्यामुळे त्यांना हाक मारता येणार नाही. आता त्या अमेरिकेत आल्या आहेत. आमचे ४ शयनकक्ष असणारे घर आहे. आमच्या बाजुच्या खोलीत झोपतानाही त्यांना सतत हीच भीती वाटते. मी खूप समजावले की मरण कुणाला चुकलय? ते जेव्हा येणार तेव्हा येणार. सतत घाबरून काय उपयोग? त्यापेक्षा आला दिवस मजेत घालवणे चांगले नाही का? पण त्यांच्या मते मरणाचं भय काय आहे ते साठीला आल्यावरच कळतं. मला विचारायचय की तुमच्या घरात कुणाला असा अनुभव आहे का? असेल तर त्यावर तुम्हाला काही उपाय सापडलाय का? त्या रात्रभर झोपू शकत नाहीत आणि त्यामुळे आम्हालाही आरामात झोपायला अपराधी वाटतं.

तुमच्या मदतीच्या अपेक्षेत

श्रावणी