सरपटणारे विनोद (२)

( भाग दोन मध्ये थोडा बदल. म्हणजे टि. व्ही. वर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा, किंवा जाहिरातीचा संबध, खाली सरपटणाऱ्या बातम्यांशी लावला तर काय धमाल येईल...)

  • ग्रामीण भागात दोन मामे बहिणी विवाह करणार - अब्बास टायरवाला ची तीन तास कसून चौकशी.
  • आज राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता - उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य!
  • अमेरिका इराक युद्ध भडकले - इंग्लंड चार धावांनी पराभूत. तेंडुलकर सामनावीर!
  • "काय? तु काल रात्री कसलीच खबरदारी घेतली नाही? " - डेंगूची साथ. योग्य ती खवरदारी घ्या!
  • शेअर बाजाराची उसळी! - "अशा प्रकारच्या उसळींचा आपण आहारात नेहेमी सामावेश करावा! "
  • राज्यभर दुष्काळी परिस्थिती - "मला माझ्या मुलीला वाचवायला हवं. मी साबणाचं नाव सांगायला विसरले! "
  • -च्या निधनाने एक उमदा खेळाडू हरपला - " उंची सहा फुट, रंग गोरा - सापडल्यास या क्रमांकाअर संपर्क साधा! "
  • इंग्लंडमध्ये मॅडम टुसाडस मध्ये शहारुखचा पुतळा बसवला - सलमान घोड्यावरून पडला.