मेथीचा झुणका

  • मेथी - १ जुडी
  • डाळीचे पीठ १/२ वाटी
  • तेल- ३-४ चमचे
  • हिंग, मोहरी, हळद, तिखट
  • मीठ चवीप्रमाणे
१५ मिनिटे
२-३ जणांसाठी

मेथी निवडून, स्वच्छ धुवून घ्यावी. बारीक चिरून घ्यावी. कढईत तेल गरम करावे. त्यामध्ये मोहरी घालावी. मोहरी  फुटली की हिंग, हळद, तिखट टाकावे. नंतर मेथी टाकावी. शिजू द्यावी. नंतर डाळीचे पीठ टाकावे व मेथी मध्ये व्यवस्थित एकत्र करावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. झाकण ठेवावे व वाफ येउ द्यावी. मेथीचा झुणका तयार!

झुणका  शिजवताना जास्त पाणी घालू नये. डाळीच्या पीठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करावे.

गरम पोळी, झुणका, त्यावर मोहरीचे तेल व सोबत लोणचं...!