शब्दकोडी कागदावर कशी छापावी?

माझ्या आईंना (सासूबाईना) शब्दकोडी सोडवायला खूप आवडतात. त्या भारतात रोज मराठी वर्तमानपत्रातील कोडी सोडवतात. पण सध्या त्या अमेरिकेत आहेत. इथे त्यांना कोडी सोडवायला मिळत नाहीत.

कोडी सोडवल्याने त्यांचा वेळही चांगला जातो आणि स्मरणशक्तीला चालनाही मिळते.

मी त्यांना मनोगतावरील शब्दकोडी दाखवली पण खूप प्रयत्न करूनही त्यांना ही कोडी संगणकावर सोडवायला जमत नाहीत. अजून त्यांना संगणक हाताळता येत नाही. आता वयोमानाने संगणक त्यांना अवघडही वाटतो.
मी एकदा मनोगतावरील एक शब्दकोडे कागदावर प्रिंट करून दिले पण मजकुराचा फॉन्ट खूपच बारीक आला. तो वाचताही येत नाही.

मला असे विचारायचे आहे

1. शब्दकोडी कागदावर मोठ्या अक्षरात कशी छापता येतील?

2. शब्दकोडी छापताना प्रतिक्रिया आणि आजूबाजूचा मजकूर टाळता येईल का?

3. कोडी कागदावर छापून घरी सोडवायला प्रशासकांची काही हरकत तर नाही ना?

धन्यवाद