असचं काहीतरी.. केव्हातरी सुचलेलं....

१)
गझल काय असते? गझल म्हणजे काय?
ताल "नर" असतो.. तो चेतना देतो.
लय "मादी" असते.. ती अर्थास जपते.
या दोघांनी स्वरांच्या चांदराती केलेली प्रणयक्रीडा म्हणजे गझल!
तसं गझलेला शब्दात पकडणं अवघड आहे.
Hence,I think,Gazal is a Thing not to be discussed but its a Thing to be experienced.
अजून एक साम्य मला फार Feel होतं.. ते म्हणजे, मदनमोहन आणि मेहदी हसन हे या क्षेत्रातले बादशाह.
दोघांचीही नावं ’म’ पासूनच सुरू होतात. हा निव्वळ योगायोग की कुठला ऋणानुबंध आहे?
साहिरने लिहलेली मदनमोहनची  "नग्मा-ओ-शेर की सौगाध" ही गझल आणि त्याच्या मुखड्यातच लताने लावलेला वरचा सूर मला फार व्याकूळ करून जातॉ.

२)
काही गोष्टी फार Touch होऊन जातात. का ते कळत नाही. पण त्यांचा Presence पुन्हापुन्हा मनाला जाणवत राहतो.
अर्थात, या कुठेतरी आत जपलेल्या असतात. भवतालच्या व्यवहारी जगात त्या मी बोलत नाही.
किंबहुना त्याविषयी बोलू नये असं माझं मत आहे.

गावाहून आल्यावर उघडल्यावर, खूप वेगळं वाटणारं आपलंच घर..
मनात झिम्मा खेळत राहणारी कवितेची एखादीच ओळ..
नेमका लागल्यावर, माझ्या डोळ्यात टचकन पाणी आणणारा धैवत..
कुणितरी निष्कारण उपेक्षा केल्यावर होणारी, कोणालाच सांगता न येणारी, असहाय्य तडफड..
एखाद्या छान मुलीशी बोलताना काळजावर पडणारा अत्तरसडा..
कमनीय बांधा बघताना, "तारीफ करू क्या उसकी, जिसने तुम्हे बनाया" असं काहिसं येणारं जरासं Naughty फिलींग..
रस्त्यातून जाताजाता, सहज पाठीवरून हात फिरवताच, थरारून उठणारे गाईचे अंग अन तिचे अपार करुणाघनांसम पाणीदार डोळे..
दुर्गासप्तशतीतील श्लोकांचा धीरगंभीर नाद..
सत्यनारायणाच्या प्रसादाची चव...
आभाळ भरून येताना उधळला जाणारा मृदगंध..
सगळी झाडे बहरली असताना, वीज पडल्याने एकटचं निष्पर्ण झालेलं दुर्दैवी झाड..
निशा व्यापून उरणारा आणि प्राणाप्राणात वीज ओतणारा निशीगंध..
प्राक्तनाचे तडाखे बसल्याने, हताश झालेला कोणी जीव..
जीवदशेवर बद्ध योग्याची ईशप्राप्तीसाठीची तळमळ..
कुणाचातरी "नाही" ऐकून कुणाच्यातरी काळजावर पडलेली वीज..
नव्याकोऱ्या वहीचा, शब्दातीत सुवास..
ओलेत्या संध्येतल्या स्त्रीस्पर्शाने मोहरलेली गात्रं..
सेकंदाचा उशीर झाल्याने डोळ्यासमोर निघून गेलेली रिकामी बस..

अशा असंख्य सूक्ष्म भावलहरी मनाने कुठेतरी, केव्हातरी टिपलेल्या असतात.
लिहायला बसलं, त्यांचे अनाहत नाद, समोर साकार होतात आणि शब्दातून असे झिरपतात.