त्रिवेणी

१.

एखादा पारवा खिडकीत येऊन बसल्याशिवाय
कळून येत नाही
आपल्या घराची उंची

२.

सापडता सापडत नाही
या वेदनेचे दुसरे टोक
या जन्माचे अन्य नाव..

३.

मंदिरातून घंटानाद
मशीदीतून अजान
मी मात्र मौनच

४.

रात्रीच्या या संदिग्ध प्रहरात
कुणाला बोलावताहेत
झाडांच्या निश्चल सावल्या....

५.

मनसोक्त दारू पिली
फुल्ल शिव्या हासडल्या
तरी धुमसतेच आहे, फ्रस्ट्रेशनची धुनी.

६.

ती बाई मला मघाचपासून खुणावतेय
मला जायचं नसूनही
मी उगाचच खिसे तपासतोय.

अनंत ढवळे..

अन