ऑगस्ट
१७
२००९
पुण्याच्या किंवा एकंदर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत 'सकाळ' चा फार महत्त्वाचा वाटा आहे - असा तमाम जनतेचा समज करून देण्यात खुद्द 'सकाळ'च आघाडीवर आहे. 'परुळेकर ते पवार' हा प्रवास 'पत्रकारिता ते पैसा' असा झाला आहे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. निव्वळ वैचारिक असे काही लिहिले तर ते खपत नाही, आणि शेवटी वृत्तपत्र खपले नाही, तर त्यातले विचार वाचणार कोण? या तत्त्वावर 'सकाळ' च्या चालक / मालकांचा इतका काही विश्वास आहे, की त्यामुळे वाचक हा निव्वळ 'तिसरी ब' मधला विद्यार्थी असून त्याला रोज न्याहारीला काहीतरी खमंग, चुरचुरीत आणि खुसखुशीत दिले की झाले, हे त्यांनी आपले धोरणच करून टाकले आहे. बरोबरच आहे. 'सकाळ' चे पडद्याआडचे सूत्रधार नाही का, 'आधी सत्ता, मग बदल' हे धोरणच अवलंबत आले? सत्ताच नसेल तर मग बदल होणार कसा?
पण 'सकाळ' ला पर्याय नाही. पुण्यात तर नाहीच नाही. सकाळच्या चहाबरोबर 'सकाळ' नसेल तर पुणेकरांना कायकाय अडचणींना सामोरे जावे लागते, याबाबतचा एक असभ्य वाक्प्रचार पुण्यात प्रसिद्धच आहे. मग 'सकाळ' ने काहीही छापावे आणि आम्ही ते मिटक्या मारत वाचावे. आवडले नाही तर 'छा! यांना काही अकला आहेत की नाही? ' असे म्हणून पान उलटावे आणि दुसऱ्या दिवशीच्या 'सकाळ' ची वाट पाहावी. ''सकाळ' हे निर्बुद्ध लोकांचे वर्तमानपत्र आहे' या सकाळमध्येच काम करणाऱ्या एका पत्रकाराचे मत ऐकून आम्ही मान डोलावली होती. 'आयुर्वेद? हा काय आयुर्वेद आहे? दुकानं आहेत ही दुकानं! ' आमचे एक वैद्य मित्र म्हणाले. आम्ही मान डोलावली. 'लवासा ते ताडोबा ... किती म्हणून भूक असावी या लोकांची! ' एक पर्यावरणवादी संतापून म्हणाले. 'आता 'सकाळ' बंदच केला पाहिजे साला! ' ते पुढे म्हणाले. आम्ही परत मान डोलावली.
'आजचं 'मुक्तपीठ' वाचलं का तुम्ही? ' एक अंधश्रद्धा निर्मूलनवाले म्हणाले. ' अहो काय, नातू सी. ए. झाला म्हणून दिलेल्या पार्टीत दिवंगत आजीच्या रुपाने कावळा येऊन (आजीची आवडती) शेव-बटाटा पुरी घेऊन जातो काय, मृत आजोबांचे नाव लिहिलेल्या पाटावर बसलेल्या नातीच्या लग्नात तिला आपण आजोबांच्या मांडीवरच बसल्याचा भास होतो काय.... काय वर्तमानपत्र आहे की चेष्टा? ' आम्ही परत मान डोलावली.
घरी येऊन जेवण झाल्यावर वामकुक्षीआधी 'मुक्तपीठ' चाळताचाळता बाकी हा प्रश्न पडला, 'या 'सकाळ' चं करायचं तरी काय?'
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?

यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
काही करण्याचे कारण नसावे.
प्रे. भूषण कटककर (सोम., १७/०८/२००९ - ०६:२६).
हाहाहाहा...
प्रे. श्रावण मोडक (सोम., १७/०८/२००९ - ०६:४०).
मनातले बोललात !
प्रे. नीता आंबेगावकर (सोम., १७/०८/२००९ - ०८:०३).
सकाळ
प्रे. कावळा (सोम., १७/०८/२००९ - २०:४२).
तुम्हाला कोठला पेपर चांगला वाटतो?
प्रे. काळा पहाड (सोम., १७/०८/२००९ - २१:४५).
हा हा हा !
प्रे. शाहिस्तेखान (मंगळ., १८/०८/२००९ - ०५:३९).
सकाळ
प्रे. मराठीप्रेमी (मंगळ., १८/०८/२००९ - ०६:०२).
सकाळ,
प्रे. कावळा (मंगळ., १८/०८/२००९ - ०६:४३).
कुठल्या कुटुंबांचे दैनिक
प्रे. चित्त (मंगळ., १८/०८/२००९ - १२:३६).
किंवा...
प्रे. छाया राजे (बुध., १९/०८/२००९ - ०६:१९).
अगदी बरोबर
प्रे. मदन देशपांडे (मंगळ., १८/०८/२००९ - ०८:५४).
चर्चा प्रस्ताव
प्रे. भूषण कटककर (मंगळ., १८/०८/२००९ - १३:१८).
'सकाळ' चं करायचं तरी काय?
प्रे. सन्जोप राव (बुध., १९/०८/२००९ - ००:५०).
अमान्य
प्रे. भूषण कटककर (बुध., १९/०८/२००९ - ०३:५६).
ठीक
प्रे. सन्जोप राव (गुरु., २०/०८/२००९ - १६:२५).
सकाळ
प्रे. बिरबल (बुध., १९/०८/२००९ - ११:२२).
या 'मटा' चे काय करायचे ?
प्रे. शरद गोखले (बुध., १९/०८/२००९ - १३:०३).
कोणते वृत्तपत्र घ्यावे?
प्रे. निरुभाऊ (बुध., १९/०८/२००९ - २२:३७).
लोकमत
प्रे. विजय देशमुख (गुरु., २०/०८/२००९ - ०४:४८).
मी लोकसता आणी म. टा. वाचतो.
प्रे. सागर रा. (गुरु., २०/०८/२००९ - ०८:०७).
सकाळ
प्रे. मराठीप्रेमी (गुरु., २०/०८/२००९ - ०९:४२).
"बऱ्यापैकी निरपेक्ष"
प्रे. निरुभाऊ (गुरु., २०/०८/२००९ - १६:३४).
निरपेक्ष?
प्रे. शुद्ध मराठी (सोम., २४/०८/२००९ - ११:३३).
खरे आहे!
प्रे. उत्पल (गुरु., २०/०८/२००९ - १७:०९).
कुठले दैनिक??
प्रे. चेतनशलाका (गुरु., २०/०८/२००९ - १८:२९).
उत्पल यांच्याकडे निदान मार्ग आहे
प्रे. भूषण कटककर (गुरु., २०/०८/२००९ - २३:१८).
कोल्हापूर सकाळ
प्रे. मिहिर कुलकर्णी (शनि., २२/०८/२००९ - १७:१२).
खरे आहे
प्रे. सन्जोप राव (रवि., २३/०८/२००९ - १५:१०).
सकाळ आणि सर्वसामान्य
प्रे. महेश (रवि., २३/०८/२००९ - १७:००).
पर्याय नाहीत.
प्रे. शुद्ध मराठी (सोम., २४/०८/२००९ - ०६:२४).
म्हैस हरवली... हा हा हा
प्रे. भूषण कटककर (सोम., २४/०८/२००९ - ०४:४७).
वडाप?
प्रे. टग्या (सोम., २४/०८/२००९ - १६:११).
वडाप..
प्रे. शुद्ध मराठी (सोम., २४/०८/२००९ - १६:४५).
कुठलातरी एक
प्रे. कुशाग्र (सोम., २४/०८/२००९ - ०९:०७).
नवीन नाही
प्रे. टग्या (सोम., २४/०८/२००९ - १७:०५).
म्हणे!
प्रे. शुद्ध मराठी (सोम., २४/०८/२००९ - ११:२९).
'सकाळ'चा..
प्रे. यशवंत जोशी (मंगळ., २५/०८/२००९ - ०५:२१).
पातळी
प्रे. निरुभाऊ (गुरु., २७/०८/२००९ - ०७:४२).
बालाजी तांबे यांनी उलगडले 'जीवनसंगीत'
प्रे. डाम्बिस बोका (मंगळ., ०१/०९/२००९ - ०८:०४).