देवीचा पोवाडा

     
मधू कैटभ असुर पाहुनि, भयाभीत ब्रह्मदेव होई
मग स्तुति करी जोडुनी कर दोन्ही, आईची भारी , आईची भारी  ध्रु.

अवतीर्ण महाकाली होई, प्रसिद्ध ती माय भवानी अंबा
प्रवेशून विष्णूच्या कायी, केली तिनं भंग योगनिद्रा
मोहवी आई असुरांशी , अहंकार उपजवी त्यांशी
देती आव्हान, विनाकारण, चक्रपाणीसी , चक्रपाणीसि, जी, जी जी. ध्रू

सर्व जग पाहुनी जलमय , म्हणती असुर काय ते ऐका हो.. हो

आम्हीच त्रिखंडाचे स्वामी, नाटोपू कल्पांतीहि तुजला
माग आता वर श्रीहरी, पुरी होईल इच्छा सत्त्वरी
मायेची प्रभा पाहूनि, छद्मी हासून नारायण म्हणती असुरांना
जरी प्रसन्न असा मजवरी, जावे यमसदनी, आता लवकरी, आता लवकरी  ... ध्रू

जलमय सर्व पाहुनि, कुटिल हासुनि"तथास्तु" म्हणती असुर दोन्ही
जल नाही जेथं जेथं , तेथं मारावे आम्हा बंधूसी
मस्तके धरुनी तत्क्षणी , छेदिली शिरे , घेउनि निजअंकी निजअंकी.....  ध्रू
ब्रह्मयासी दिधला आदेश सृष्टी नवी रचावयास

ऐसी आहे महती मायेची, आई भवानीची, जगज्जननीची  जगज्जननीची   .. ध्रु.