भा‍जप नक्की कोणता ?

सध्या भाजपचे विचार मंथन चालू आहे. त्यात भाजपला लोकसभा निवडणुकित पत्कराव्या लागलेल्या पराभवाची कारणे शोधण्याचे काम चालू आहे. एकीकडे वसुंधरा राजे आपले शक्तीप्रदर्शन करतायत. तर ज्येष्ठ नेते श्री‍जसवंतसिंह यांनी पुस्तक लिहिलेले आहे.

त्यावर वेगवेगळे नेते आपाअपली मते देत आहेत. भाजप अध्यक्श यांनाही जसवंतसिंह यांनी जिनांविषयी लिहिलेले आवडलेले नाही.

खुद्द भाजपच्या नेत्यांनाही जसवंतसिंहाची जिनांविषयीची मते पटलेली नाहीत‌. शिवसेनाप्रमुखांनी तर जसवंतसिंहाना घरचा आहेर दिलेला आहे. याच्या आधी भाजपचे नेते श्री. अडवानी यांनी ते पाकिस्तान दौर्यावर असताना व जिनांच्या कबरीवर फुले वाहताना.

जिनांना " प्रशस्तिपत्रक " दिले होते. त्यावेळी सुध्धा अडवाणींविरुध्ध काहुर माजलेले होते.

एकुणच काय तर भाजपच्या काही नेत्यांना जिनांविषयी अचानक प्रेमाचा उमाळा आलेला दिसतोय.

या उमाळ्यातून हे दोघे नेते काय साधू पाहतात हे समजत नाही.मलातर यावरून यापक्शाला काय झालेले आहे तेच समजत नाही.

यासर्व प्रकारावरून या पक्शाला "भंजाळलेल्या जनांचा पक्श का भरकटलेल्या जनांचा पक्श "म्हणावे हेच समजत नाही. आणि हा

असला, "भंजाळलेला " आणि " भरकटलेला " पक्श येत्या विधानसभा निवडणुकीत लोकांसमोर काय घेउन जाणार. आपल्याला काय वाटते ? ह्या पक्शाला ही नांवे "सार्थ " वाटतात का?