ऑगस्ट २१ २००९

मनोगत दीपावली २००९

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.


विग्नहर्त्याच्या स्वागतात सर्वजण दंग असतानाच मनोगतींना अजून एक महत्त्वाची आठवण करून द्यायची आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनोगत दिवाळी अंकाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अंकासाठी साहित्य पाठवण्याचं आवाहन या आधीच मनोगतावरून केलं गेलेलं आहे. त्याला अनेकांचा प्रतिसाद मिळत आहेच. पण या निवेदनाद्वारे पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाची विनंती -

मंडळी, गजाननाचा आशीर्वाद घेऊन पटापट लेखणी हातात घ्या. तुमच्या मनातले विचार कागदावर उतरवा. कागदावरून उचलून त्यांना विरोपाच्या मखरात बसवा. त्या मखरात सजलेले ते साहित्यकण आमच्यापर्यंत लवकरात लवकर diwali.manogat@gmail.com या पत्त्यावर पोहोचवा. लिखाण पाठवण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २००९ ही आहे. साहित्य पाठवण्यासंबंधीच्या इतर सर्व अटी दुवा क्र. १ इथे दिलेल्याच आहेत.

दिवाळी अंक सुंदर, देखणा, वाचनीय करण्यासाठी जास्तीत जास्त मनोगतींचा हातभार लागावा हीच या निवेदनामागची एकमेव इच्छा आहे.  

तेव्हा करा सुरूवात... आपल्या प्रतिसादांची आम्हाला प्रतीक्षा आहे.

गणपतीबाप्पा मोरया!

Post to Feedमुदत वाढवली आहे
पुढे काय?
पाककृती हव्या आहेत

Typing help hide