होम

अग्निहोत्र जेथे केले जाते ती जागा एक प्रकारच्या कंपनाने किंवा स्पंदनाने
भारली जाते. या होमासाठी चंदनाच्या लाकडाचा ते प्रदुषण विरहित असल्याने
उपयोग केला जातो.
होमात मुख्यतः साजुक तूप, विशिष्ठ झाडाच्या समिधा किंवा लाकडे, शिजवलेला भात व इतर आवश्यक वस्तू अग्निला अर्पण केल्या जातात.
ह्या अर्पण केलेल्या वस्तू व कळकळीने केलेली देवाची प्रार्थना यज्ञासाठी
आवश्यक आहेत. यज्ञ चालू असताना केलेल्या प्रार्थनेमुळे योग्य त्या देवता संतुष्ट होतात व आपल्या पीडा दूर करून आपले संरक्षण करतात. आपल्या जीवनात भरभराट आणतात.  होमात रोग नाश करण्याची शक्ती आहे. तसेच देवाकडे मागणे मागण्यासाठी ते एक साधन आहे.
आपण ज्या देवताना आवाहन करून होमात आहुत्या देतो त्या देवापर्यंत
पोहोचवण्याचे माध्यम अग्निदेव आहे. माणूस व देवता यामधील ते पवित्र दुवा
आहेत. होमामुळे सभोवतालच्या वातावरणात विशिष्ट परिणाम होतोच पण माणसाच्या
मनावरही त्याचा परिणाम होऊन त्यच्यावर रोगप्रतिबंधक उपचार होतो.
आयुर्वेदात रोगनाशक उपायांचा विशेष उल्लेख आहे.
येथे भोपाळच्या प्रसिद्ध घटनेबद्दल सांगणे थोडे सयुक्तिक होईल. डिसेंबर
१९८४ ला भोपाळ शहरात झालेल्या दुर्घटनेमुळे सारे जग हादरले होते.
युनियन कार्बाईडच्या फॅक्टरीतून केमिकल गॅस लिक होऊन हजारो लोक मेले होते व जवळ जवळ एक लाख लोक विषारी वायुमुळे  आजारी  पडले होते. आता सांगणारा प्रसंग हा रेकॉर्डवर आला आहे. २ व ३ डिसेंबरच्या रात्री दीड वाजता श्री. एस. एल. कुशवाहा (४५), हे शिक्षक, आपली पत्नी त्रिवेणीच्या (३६) होणाऱ्या ओकाऱ्यामुळे जागे झाले̮अवकरच त्याना व
त्यांच्या मुलांना पण खोकल्याचा त्रास होऊन छातीत दुखू लागले. तसेच
डोळ्यात जळजळ सुरू झाली. जीव गुदमरावयास लागला. त्यानी आपल्या घराच्या
बाहेर पाहिले असता, अचानक आलेल्या संकटामुळे लोक भीतीने सैरावैरा पळत
होते. त्यांच्यापैकीच एकाने श्री. खुशवाला याना सांगितले की तेथून एक
मैलावर असलेल्या युनियन कार्बाईड फॅक्टरीमधून विषारी केमिकल गॅस लीक झाला
आहे.
त्याचे बोलणे ऐकून खुशवाला यानी पळणाऱ्या या गर्दीत सामिल होऊन पळण्याचे
ठरवले. तेवढ्यात त्यांच्या पत्नीने त्याना सुचवले की आपण आपल्या घरात होम
का करू नये? ते ऐकून खुशवाला यानी घरात होम केला व वीस मिनिटात घरात
असलेला विषारी गॅस निघून गेला.
असेच एम. एल. राठोड (३३) त्यांची बायको व चार मुले, आई व भाऊ भोपाळ स्टेशनजवळ राहत होते.  त्या स्टेशनजवळ डझनभर लोक  गॅसमुळे मेले होते. त्या राठोडनी घरात होम चालू केला व तो त्र्यंबक होम सतत चालू ठेवला.
त्यामुळे त्यांच्या घरातील विषारी वायू निघून गेला व सर्व कुटुंब सुरक्षित राहिले.
अग्निहोत्रामुळे भोपाळच्या गॅसकांडातून वाचलेल्या लोकांपैकी ही दोन
उदाहरणे दिली आहेत. भोपाळच्या या प्रसंगाने आपल्यावर किती नुकसानकारक
महासंकट येऊ शकले ते दाखवले आहे. घरी केलेल्या होमाचा उपाय हा गॅसकांडातून
बाहेर येण्याचा एक मार्ग म्हणून पाहता येईल.
हल्ली वातावरणातील वायूच्या प्रदुषणामुळे समतोल बिघडला असताना, वेगवेगळ्या
कलांचा विकास करण्याच्या शर्यतीमुळे संस्कृतीमधील समतोल बिघडलेला असताना व
माणसाला जेंव्हा जीवनात आपण एकटे आहोत, आपले अंतःकरण व मनही रिकामे आहे
असे वाटू लागलेले असताना, मनाला नवसंजिवन देणाऱ्या अग्निहोत्राचे हे
शास्त्र लोकांचे जीवन सुधारण्यासाठी खूप काळ चालूच राहील.