खुसखुस

  • एक वाटी खुसखुस
  • एक वाटी गरम पाणी
  • एक मध्यम टोमॅटो बारीक चिरून
  • एक मध्यम कांदा बारीक चिरून
  • एक हिरवी मिरची बारीक चिरून, दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरून
  • दोन चमचे लिंबाचा रस
  • दोन चमचे फोडणीकरिता तेल
  • मोहरी, हिंग. अर्धा चमचा चाट मसाला, एक चमचा लाल तिखट
  • दोन चिमूट साखर व चवीनुसार मीठ
२० मिनिटे
तीन माणसांकरीता.

एक वाटी गरम पाणी घेऊन ते खुसखुसवर ओतून चमच्याने ढवळून लागलीच झाकण ठेवावे. टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. पाळीत तेल गरम करून नेहमीसारखी मोहरी व हिंगाची फोडणी करावी. हळद मात्र घालू नये.  वीस मिनिटाने झाकण काढावे. खुसखुसचे दाणे चांगले फुगून आलेले दिसतील. आता त्यात साखर, मीठ व चिरलेला टोमॅटो, कांदा, मिरची व लिंबाचा रस घालून सगळे मिश्रण एकत्र करावे. त्यावर तयार केलेली फोडणी घालून पुन्हा सारखे करावे. थोडे तिखट हवे असल्यास वरून लाल मिरचीचे तिखट भुरभुरावे. वाढताना कोथिंबीर घालून वाढावे. खुसखुस (couscous)br />

खुसखुस (Couscous ) हे गव्हाचे असल्याने प्रकृतिलाही चांगले व गव्हाची
प्रक्रिया केलेली ( प्रोसेस्ड-सेमोलिना ) भरड असल्याने जवळजवळ शिजलेलेच
असते. खुसखुस गॅसवर शिजवायचे नाही. कोशिंबीर या सदरात मोडत असले तरी याने
पोट भरते. आवडत असल्यास यात अर्धी वाटी मक्याचे गोड दाणे/मटार वाफवून
घालावेत. झटपट होणारे चवदार सॅलड.