प्रार्थना

ज्या विधात्याने हे जग निर्माण केले आहे व जो त्याची जबाबदारी पेलतो अशा विश्वकर्म्याला मानवापासून कांहीही नको असते. सर्व सुखांची भेट देणारा व त्याकारता आशीर्वाद देणारा तो सर्वश्रेष्ठ आहे. या पृथ्वीतलावरील प्रत्येक गोष्ट इश्वरनिर्मित असल्याने, मानवाला कोणतीच गोष्ट माझी आहे व ती इश्वराला अर्पण करतो असे म्हणता येणार नाही. प्रत्यक्षात हा दयाळू परमेश्वर माणसाकडून कशाचीच अपेक्षा करत नाही. मनुष्याने प्रार्थना किंवा धर्मनिष्ठा याबद्दल ढोंगीपणाने स्तोम माजवले तर मात्र देवाला आनंद न होता दुःख होते. त्याला त्याच्या मुलाकडून पवित्र मन व प्रेमाने भरलेले अंतःकरण असावे एवढेच अपेक्षित आहे.

भक्तांना परमेश्वर निरनिराळ्या प्रकारे व विविध मार्गाने मदत करतो असे धर्मग्रंथ सांगतात. ही मदत मिळवण्यासाठी देवाची मनापासून व पूर्ण विश्वासाने केलेल्या प्रार्थनेची गरज आहे. भक्त आपल्या सततच्या व मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे आपले पावित्र्य वाढवतो. परमेश्वर अत्यंत दयाळू असून तो सहज प्राप्त होणारा आहे. देवाच्या या विशिष्ट गुणाकडे आपले धर्मग्रंथ पुन्हा पुन्हा लक्ष वेधतात. भक्ताने पूर्ण विश्वासाने देवाला शरण जाऊन अंतःकरणापासून केलेल्या प्रार्थनेला देव त्याचे दुःख हलके करण्यासाठी नक्कीच मदत करतो.

श्वासोच्छ्वासाशिवाय आपण राहू शकत नाही या विचारा व्यतिरिक्त आपण कुठल्याही गोष्टीचा मानसिक आकृती निर्माण केल्याशिवाय अधिक विचार करू शकत नाही. समाजाच्या नियमानुसार पंचमहाभूता पासून तयार झालेल्या मूर्ती आपल्याला मानसिक बौद्धिक कल्पना करावयास लावतात. तसेच बौद्धिक कल्पना आपल्याला देवाबद्दलचा विचार करावयास लावतात. यासाठीच जेंव्हा हिंदू माणूस प्रार्थना करतो तेंव्हा बाहेरील प्रतिमांचा वापर करतो. ज्याची प्रार्थना करतो त्यावर मनाची एकाग्रता ठसवण्यासाठी त्या प्रतिमांचा त्याला उपयोग होतो. पावित्र्याच्या, शुद्धतेच्या, सत्याच्या सर्वव्यापी परमेश्वराबद्दलच्या आणि अशाच वेगवेगळ्या कल्पनेने हिंदुंनी देवाची वेगवेगळी रुपे बघितली आहेत. ती सर्व त्याला फक्त धार्मिक बाबतीत मदत करतात. पण या सर्व कल्पनांनी सुद्धा त्याने फक्त प्रगती करावी हीच भावना असते.

मूर्तीची पूजा किंवा बाह्यपूजा ही सर्वात खालची किंवा पहिली पायरी आहे असे धर्मग्रंथ सांगतात. कष्टपूर्वक वरची पायरी मिळवण्यासाठी मनापासून केलेली प्रार्थना पुढची पायरी आहे. पण सर्वात वरची पायरी म्हणजे त्याला ज्यावेळी परमेश्वराचा साक्षात्कार होतो किंवा परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलचा बोध होतो ती होय. हिंदू माणूस चुकीकडून सत्याकडे प्रवास करत नाही तर कमी सत्याकडून अधिक सत्याकडे प्रवास करतो. त्याच्या दृष्टीने सर्व प्रकारचे धर्म, मग ते आदीवासीने केलेल्या पूजेच्या मूर्तीपासून माणसाला मुक्तता मिळेपर्यंतच्या अनेक पूजा बद्दल असो, हे सर्व केलेले मानवी आत्म्याचे प्रयत्न देवाला ओळखण्यासाठी व भेटण्यासाठीच आहेत. प्रत्येक पूजा प्रगतीचे एकेक पाऊल आहे. प्रत्येक आत्मा हा लहान गरुड पक्षाप्रमाणे असून आकाशात ज्याप्रमाणे गरुड उंचच उंच झेप घेतो व शक्ती मिळवतो व सूर्यापर्यंत पोहोचण्याचे ध्येय उराशी बाळगतो त्याप्रमाणे देव भेटेपर्यंत आत्म्याची धडपड चालूच असते.