ब्लॉग वा संकेत स्थळ निर्मितीसंबंधी मार्गदर्शन हवे आहे.

गेले काही दिवस मी मराठीतून एक ब्लॉग तयार करीत आहे.( दुवा क्र. १ ) ग्रंथालय व माहिती क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी असणारा हा ब्लॉग तयार करताना मला त्याचा दर्शनी भाग ( ईंटरफेस ? ) हवा तसा करता येत नाही. मला मनोगतवरील वरील बाजूस ( डॅशबोर्ड ? ) दिसणारे "मुखपृष्ठ, गद्य साहित्य, कविता , चर्चा, पाककृती, कार्यक्रम , पुस्तके" असे वेगवेगळे विभाग किंवा एखाद्या संकेत स्थळावर ज्या प्रमाणे वेगवेगळे विभाग दर्शविण्यासाठी असे स्वतंत्र व आकर्षक चित्रण वा लिंक्स असतात, तशा प्रकारचा दर्शनी भाग "सेट अभ्यासाविषयी, सदस्यता घ्या/ प्रवेशाची नोंद करा, सेट अभ्यासक्रमातील टॉपिक्सबद्दल, या उठाठेवीचा उद्देश " आदी काही विभागांसाठी करायचा आहे. पण संगणकाची, इंटरनेटची आणि ब्लॉगची पुरेशी माहिती (विशेषतः तांत्रिक ) नसल्यामुळे अडखळल्यासारखे झाले आहे. मनोगतवर पूर्वी झालेल्या ब्लॉगविषयीच्या चर्चांमधून काही माहिती मिळते का पाहिले पण काहीच सापडले नाही. यासंदर्भात काही मार्गदर्शन मिळेल का?

दुसरे:- वेब डिझाइनिंग या विषयावर मराठीतून पुस्तक उपलब्ध आहे का? माझ्या ग्रंथालयात असणारे सर्वच ग्रंथ इंग्रजी व तेही पदव्युत्तर वर्गांसाठीचे संदर्भ ग्रंथ आहेत. ते समजून घेताना प्राथमिक ज्ञान नसल्याने अडचण जाणवते.