सप्टेंबर
२४
२००९
जिन्नस
- बेसन- १ कप
- ओले खोबरे - १ कप
- दूध - १ कप
- तूप -१ कप
- साखर- ३ कप
- वेलची पूड - चिमूटभर.
मार्गदर्शन
वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करून १ तासभर ठेवावे.
नंतर मंद आचेवर ते शिजवावे. शिजवताना एकसारखे ढवळत राहावे.
एका बाजूला एका ताटाला तूपाचा हात लाऊन ठेवावा.
कढईला जे बाजूनी मिश्रण चिकटलेले असते ते कोरडे पडायला लागले आणि कढईतले मिश्रण घट्ट व्हायला लागले की शिजले असे समजावे.
आणि मग ते मिश्रण त्या ताटात ओतावे. एका जाड प्लास्टिकच्या कागदाला थोडे तूप लाऊन त्याने मिश्रण ताटात पसरावे.
आणि मग थोडेसे थंड झाले की सुरीने हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्या.
टीपा
हवे तर प्रत्येक वडीवर काजू, मनुका किंवा पिस्त्याने सजवू शकता.
माहितीचा स्रोत
माझी एक वहिनी...
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
बेसनाच्या वड्या
प्रे. मराठीप्रेमी (शनि., २६/०९/२००९ - ०६:४५).
मोहनथाळ
प्रे. आजानुकर्ण (शनि., २६/०९/२००९ - ०७:५१).
आवडली
प्रे. मन्जुशा (शनि., २६/०९/२००९ - १२:००).
छान.
प्रे. भाग्यश्री कुलकर्णी (रवि., २७/०९/२००९ - ०३:१६).
धन्यवाद!!!
प्रे. मैफ़ल (मंगळ., ०६/१०/२००९ - २०:०५).