किती डोकवावे

मला एक प्रश्न पडला आहे. आई वडिलांनी मुलांच्या संसारात, निर्णयांमध्ये, दैनंदिन जीवनात किती हस्तक्षेप करावा?

कालचीच गोष्ट. माझे पती बराच वेळ मोबाईल वर बिझीनेस बद्दल बोलत होते. नेहमीच त्यांचा फोन चालतो. तर त्यावरून घरात वाद झाले. आईंचे म्हणणे की तू व्याप कमी कर व त्यांचे म्हणणे 'मलाही समजते, मोठी ऑर्डर होती व बोलल्या खेरीज चालणारच नाही. अशाने हातचं राखून बिझीनेस होऊ शकत नाही!'

हे एक उदाहरण झाले, पण प्रत्येक वेळी त्यांचा हस्तक्षेप, सल्ले, अपेक्षा यामुळे प्रेमापोटी असूनही असे वाद उद्भवतात.

 मोकळीक, स्वातंत्र्य यांचे मोल मोठे आहे, पण त्याच वेळी कुणीतरी आवरायला, नाही म्हणायलाही हवे असे वाटते.......

काय बरोबर आणि काय चूक ते समजत नाहीये... आपली मते अपेक्षीत.