सुखास आता तुझे नाव आहे

उरात आता नवा भाव आहे
सुखास आता तुझे नाव आहे

'दिला'स या तूच चोरून नेले
दिसायला तू जरी साव आहे

उगाच पत्ते बघू मी कशाला?
तुझ्याच हाती दिला डाव आहे

'लिना' घरी हाय! - पाटी 'रिना'ची
असा कसा हा तुझा गाव आहे?

कट्यार जर ती तुझ्या मालकीची
तयार मी सोसण्या घाव आहे

'दिला'त माझ्या असे खूप जागा
तुझ्या सहेलीसही वाव आहे!

------------------------------------------------
(जयन्ता५२)