ना चांदण्यास जमले

ना चंदनास जमले ना चांदण्यास जमले
तो दाह ईश्वराला ना शमविण्यास जमले

घर बांधले तुझे तो नवखा कुणी गवंडी
त्या दोन चार खिडक्या ना बांधण्यास जमले?

अवगत अनेक होत्या भाषा मला, परंतु
बोलीत प्रीतिच्या त्या ना बोलण्यास जमले

बस,पाहिले तुला अन् येथेच राहिला तो
येथून त्या वसंता ना परतण्यास जमले

दिन रात शहर सारे फिरते तुझ्याच मागे
एकांत तुज कुठेही ना भेटण्यास जमले

मी पाहिले तुला ती कोजागिरी असावी
प्रत्येक रात्र नंतर ना झोपण्यास जमले

-----------------------------------------------
(जयन्ता५२)