ऑक्टोबर २१ २००९

वृत्तपत्रांची भाषा

आजच्या लोकमत या वृत्तपत्रात लोकप्रिय कादंबरीकार श्री. बाबा कदम यांच्या मृत्यूची बातमी वाचली. बातमीचा शेवट ज्या वाक्याने केला आहे. तो प्रत्यक्ष दुवा क्र. १ या दूव्याद्वारे पाहावा. बातमीतून जणू काही (बाबा कदमांसारख्या शिकार कथा लेखकाची वार्धक्याने शिकार /) खून केला असल्याचेच ध्वनित होते. शोककळा पसरणे समजू शकते पण खळबळ माजणे जरा खूपच झाले. तसे पाहता लोकमत हे एक दर्जेदार समजले जाणारे, विविध आवृत्त्या असलेले वृत्तपत्र आहे. त्यासारख्या वृत्तपत्रात भाषेचा असा चिकित्साशुन्य उपयोग केला जात  असेल तर ग्रामीण भागातल्या वृत्तपत्रांबाबत न बोलणेच बरे. आमच्या बारामतीमध्ये सुमारे १५ स्थानिक वृत्तपत्रे निघतात. त्यामधील शुद्धलेखनाच्या  "ण"ळाला पा"नी" येणार नाही हे आम्ही सवयीने समजून चालतो. पण निदान दर्जा सांभाळणाऱ्या वृत्तपत्रांनी तरी विचार करायला हवा.

Post to Feed

ण/न
वर्तमानपत्रांची भाषा
परखड यांनी...
सहमत

Typing help hide