वांग्याचे काप

  • वांग्याचे गोल काप (चकत्या), मीठ, तिखट, तांदुळाची पिठी, तेल
१५ मिनिटे
एका मोठ्या वांग्याचे साधारण १० काप होतात. त्यानुसार वाढणी बदलेल.

कृती -

१. वांग्याचे मध्यम जाडीचे गोल काप करावे. [यासाठी 'भरताचे वांगे' वापरणे. छोटे काटेरी वांगे नव्हे.]

२. तांदुळाच्या पिठीत चवीनुसार मीठ, लाल तिखट कालवून घ्यावे.

३. वांग्याचे काप या पिठीत घोळून घ्यावे.

४. तापलेल्या तव्यावर हे काप तेलावर परतावे. कापांच्या कडेने तेल सोडणे.

असे खरपूस भाजलेले काप जेवताना 'तोंडीलावणे' म्हणून छान लागतात.

नाहीत.

अर्थातच आमच्या माऊली !!