ऑक्टोबर २६ २००९

कळावे कसे


किती डोकवावे, कुणाच्या मनी हे कळावे कसे        
कुणा आपले हो म्हणावे, कुणा प्रेम द्यावे कसे

तुझे हासणे भासते चांदणे चंद्रबिंबासवे
चकोरास थेंबातले तृप्त होणे, जमावे कसे

इथे हात नाहीत गोंजारणारे, कळ्यांचे सखे                                                     
फुला-रोपट्यांनी डुलावे, झुलावे खुलावे कसे

कुठे भेटली ती मला एकटीशी, म्हणावी तशी
जरी हासली गोड- जन्मास सार्‍या पुरावे कसे

जमावास बंदी कशी घातली पापण्यांनी तुझ्या
कधी लोचनांच्या तटी आसवांनी जमावे कसे

Post to Feed

वावा!
सहमत..
हेच
सहमत
किती डोकवावे, कुणाच्या मनी हे कळावे कसे
गझल आवडली..
धन्यवाद !
मतल्याची पहिली ओळ
वा
जमावें कसे आणि जमावबंदी ......
आभार !
क्या बात है...

Typing help hide