सकारात्मक दृष्टिकोन

जगाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. "सांगा कसं जगायच ? कण्हत कण्हत की गाणं म्हणत, हे तुम्हीच ठरवायच !" मंगेश पाडगावकर यांची ही कविता तुम्हाला माहीत असेल. पाण्यात अर्ध्या भरलेल्या पेल्याकडे पाहून काहीजण म्हणाले "पेला अर्धा भरला आहे."  काही जण म्हणाले "पेला अर्धा सरला आहे"! पहिल्या प्रकारच्या लोकांचा द्रूष्टीकोन सकारात्मक होता. दुसऱ्या प्रकाराचा लोकांचा द्रूष्टीकोन नकारात्मक होता. एकच वस्तू निरनिरळ्या कोनातून निरनिराळी दिसते. चित्रकलेत 'स्थिरचित्र' किंवा 'स्टीललाईफ' काढताना प्रत्येक विद्यार्थ्याचं चित्र निरनिराळं येत. तसेच कोणत्याही घटनेकडे, व्यक्तिकडे चांगल्या/वाईट, सकारात्मक नकारात्माक द्रूष्टीतून पाहता येंत. अलिकडच्या काळात मोठ्या उद्योगात मनुष्यबळाची भरती करताना तीन गोष्टी तपासून घेतात. ज्ञान, कौशल्य आणि द्रूष्टीकोन.

आशावाद हे सकारात्मक द्रूष्टीकोनाचे पुढचे पाऊल आहे. एखादी गोष्ट होईल असे म्हटल्यामुळे ती होते असे नाही. पण ती गोष्ट घडण्याचा शक्याता तरी वाढतात. "तुम्ही होणार" म्हणा किंवा "नाही होणार" म्हणा, जे घडायचं ते घडतच असे दैववादी मंडळी म्हणतात. खरचं आहे ते. काही अटळ गोष्टीवर माणसाचे नियंत्रण नसते. पण ज्या प्रयत्नसाध्य गोष्टीत आहेत त्यांच्यामागे ईच्छाशक्तिचे बळ उभे राहणे आवश्यक असते आणि ते आशावाद किंवा सकारात्मक द्रूष्टीकोनानेच साध्य होते. 'शुभ बोलनाऱ्या' अशी एक म्हण आपल्या मराठी भाषेत आहे. नाऱ्याच्या अशुभ वाणीने मांडवाला आग लागतेच असे नाही. पण चांगल्या कार्यासाठी आवश्यक अशी ईच्छाशक्ती मात्र घटते.

आपण ज्या रंगाचा चष्मा डोळ्यावर घालतो तसंच आपल्याला सारं जग दिसतं. सतत सकरात्मक द्रूष्टीकोन असेल तर आपलं सारं जगणं ही एक आनंदयात्रा होईल.

_ नारायण भु. भालेराव.