विचित्र विनोदी बातम्या (१)

  • इंग्लंडच्या समुद्रकिनाऱ्यावर मतदानापूर्वी भूकंपाने गोंधळ.. समुद्राचे पाणी हटवण्याच्या विश्वस्तांच्या मागणीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मान्यता. संजय दत्त चिडला.
  • हॅरी पॉटर  आणि शिल्पा शेट्टी राखी सावंतच्या गेम शो  मध्ये हप्त्या हप्त्याने विवाहबद्ध होणार.   मग त्यांचा हप्ता बंद होईल- आणि त्यांना निर्मितीचा आदेश मिळेल.
  • चार गावांत दारूचा दुष्काळ पडायला वृक्षतोड कारणीभुत असल्याचा दावा खोटा ठरला असून तेथे पाण्याच्या विहिरी सापडल्यात- असे मायकल जॅक्सन म्हणाला.
  • बॉंबस्फोटाचे धागेदोरे सुईपर्यंत येवून पोचल्याने इन्स्पेक्टर रक्त्बंबाळ. बॉंबचा धागा एवढा लांब कसा- गृहमंत्र्यांचा जनतेला सवाल.
  • उद्या मल्टीस्टारर चित्रपट "खुप मोठे युद्ध" हा रिलिज होणार आणि त्यात्ल्या प्रत्येक वाक्यावर सेन्सॉरने आक्षेप घेतल्याने चित्रपट  संवादांविनाच रिलि़ज केला आहे अन म्हणूनच  शेअर निर्देशांक वाढला असे देवानंद हॉस्पिटलमध्ये म्हणाला.
  • रामसे बंधूचे चित्रपट पाहिल्याने स्पायडरमॅन ने इमारतींवरून उड्या मारणे सोडून दिले.   त्याचे जाळे जमा करून कोळ्यांना मासेमारीसाठी दिल्याने सुपरमॅन खवळला.
  • बॅटमॅन चा क्रिकेटमध्ये उडत उडत १०० च्या वर स्कोर झाल्याने ऑस्ट्रेलिया हरली.
  • अक्षय कुमार विधानसभेत न आल्याने नेत्यांचा चहापानावर बहिष्कार. पारले जी बिस्कीट खावून एकटी शिल्पा परतली.
  • आमदार वात्रे यांच्या घरावर कापूसफेक आंदोलन झाल्याने त्यांनी दोरे बनवून विकले.