शेवयांचा उपमा

  • कुस्करलेल्या शेवया १ वाटी
  • साजुक तुप अथवा तेल
  • मोहोरी, हिंग
  • मीठ, साखर, लिंबू १/२
  • कांदा १/२, हिरव्या मिरच्या ३,
  • भाजलेले शेंगदाणे १०/१२
१५ मिनिटे
२ जणांना

१ चमचा साजुक तूप अथवा तेलामधे शेवया गुलाबी रंग येईपर्यंत भाजुन घेणे. शेवया भाजताना गॅस मंद ठेवणे.

४ ते ५ चमचे साजुक तूप अथवा तेलामधे मोहोरी व हिंग घालुन त्यात मिरच्या, कांदा, भाजलेले दाणे घालुन परतणे. कांदा शिजायला पाहिजे. नंतर त्यात २ वाट्या पाणी ,चवीप्रमाणे मीठ,साखर घालुन लिंबू पिळणे. ढवळणे. पाण्याला उकळी आली कि त्यात भाजलेल्या शेवया घालुन ढवळणे. नंतर झाकण ठेवून गॅस मंद आचेवर १ ते २ मिनिटे ठेवणे.

रोहिणी

नाहीत.

तमीळ मैत्रिण उमा