नोव्हेंबर १५ २००९

लवाद

बाप-लेक आज पुन्हा कडाक्यानं भांडलेत-
टोकदार अपशब्द घरभर सांडलेत..
मी सारं ऐकतेय, पाहतेय
त्याच्या डोळ्यांतले अश्रू - धुमसणारे
आणि ह्यांचे अबोल हुंदके
फक्त मलाच ऐकू येणारे...
..
दोन वादळांमधल्या अस्वस्थ शांततेत
जीव मुठीत घेऊन वावरतेय,
त्या क्षणाला टाळत-
जेव्हा मला बनावं लागेल
त्या दोघांतला लवाद ,
ज्याला नसते
स्वतःची कुठलीच दाद- फिर्याद
..
त्या दोघांची वकील, साक्षीदार
माफीचाही -
मीच असणार आहे
कुणी जिंको वा हरो, शेवटी
मीच हरणार आहे....

Post to Feed

वा...
वेगळा विषय
हेच
माफ करा.
सुंदर विषय
सुरेख कविता...
कठोर, कटू वास्तव इतके अचूक आणि संयत शब्द लेऊन ....
'मध्यस्थ' हें नाटक ...
खरेच
सुरेख..
अगदी अगदी असेच!
धन्यवाद !
वश्यश्च पुत्रो
धन्यवाद !

Typing help hide