आगळा छंद

आयुष्याची वीण मजबूत करणारे
विविध नात्यांचे असंख्य धागे.....
काही हळुवार, मायेचे हृदयाशी घट्ट,
काही अव्यक्त,
काही मुक्त,
काही बेधुंद त्या त्या क्षणांपुरते फक्त,
कधी निसटलेले,खोलवर घर करून बसलेले खास रेशमी बंध.....
तरीही एकनएक धागा मनापासून जपण्याचा प्रत्येकाला आगळा छंद...