जानेवारी २०१०

भेंडीचे भरीत

जिन्नस

  • पावशेर भेंडी (शक्यतो कोवळी घ्यावी) बारीक चिरून
  • फोडणीचे साहित्यः तेल, मोहरी, हळद, तिखट
  • दही
  • मीठ चवीनुसार, चिंचेचे बुटुक, चिमूटभर साखर
  • चिरलेली कोथिंबीर

मार्गदर्शन


चिरलेली भेंडी फोडणीस घालून कुरकुरीत परतून घ्यावी. परतताना चिंचेचे बुटुक पण घालावे म्हणजे तार सुटत नाही. भेंडी व्यवस्थित शिजली व कुरकुरीत परतली गेली की गॅस घालवून चिंचेचे बुटुक काढून टाकावे.

दही घुसळून घ्यावे. त्यात चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर साखर व आवश्यकता वाटल्यास तिखट घालावे. परतलेली भेंडी गार झाल्यावर त्यात मिसळावी. वरून कोथिंबीर पेरून वाढावे.

टीपा

वेगळा स्वाद हवा असल्यास थोडी पुदिन्याची पाने चिरून घालता येतील. त्याने भरीताच्या चवीत तीक्ष्णता येईल.

माहितीचा स्रोत

आई



Typing help hide