२०१० चा मुद्राराक्षस (१)

मुख्यमंत्र्यांसह ३८ मंत्र्यांचा शापविधी. (शपथविधी)

तरुणाचा घार करून खून. (वार)

एयर इंडीयाचे विमान बॉंबने उघडून देण्याची धमकी. (उडवून)

रोज शॉवरने आंघोळ करणे हे पातक - संशोधनाचा उत्कर्ष (घातक, निष्कर्ष)

मंत्र्यांची चढाओढ मलईदार भात्यांसाठी. (खात्यांसाठी)

मंत्र्यांची चढाओढ मसालेदार खात्यांसाठी. (मलईदार)

मंत्र्याचा अटकपूर्व जामीन अर्ज पिटाळला. (फेटाळला)

मंत्र्याचा अटकपूर्व जामीन अर्ज वीटाळला. (फेटाळला)

ध्येयासाठी मसाज एकत्र केला पाहीजे. (समाज, झाला)