फेब्रुवारी
३
२०१०
बांधकामदारा(बिल्डर)बरोबरचे सहमतिपत्र(अग्रीमेंट) हरवले तर पुढे काय?
प्रेषक लतापुष्पा (बुध., ०३/०२/२०१० - ०६:१९)
सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वी केलेले तत्कालीन बांधकामदाराबरोबरचे सदनिकेचे अग्रीमेंट न सापडण्याजोगे(इर्रिट्रीवेब्ली) हरवले आहे. स्थळप्रत उपलध नाही. सदर सोसायटीच्या कचेरीतही नाही.त्याकाळी झेरॉक्स सार्वत्रिक नव्हते. बांधकाम संस्था बंद झाली आहे. बांधकामदार मृत्यू पावून २५ वर्षे झाली. त्यांचे वारस अमेरिकेत असतात असे कळले. संबंधित वॉर्डऑफिसमध्ये कसून चौकशी केली. पैसे देण्यासही तयार होतो. पण जुन्या दस्तावेजांचे संगणकीकरण झाले आहे सबब प्रत्यक्ष कागद नष्ट केले गेले आहेत. आणि नक्कल देणे तांत्रिक कारणामुळे शक्य नाही असे सांगण्यात आले. महाराष्ट्रातील सहकारी गार्हिक(हाउसिंग सोसायटी)संस्थांची मध्यवर्ती कचेरी पुणे येथे आहे. तिथे एक नक्कलप्रत ठेवलेली असते, असे म्हणतात. तिथेही प्रयत्न सुरू आहेत. पण काम होणे कठीण दिसते. वर्तमानपत्रात जाहिरात वजा सूचना प्रसिद्ध केली होतीच. ह्या गोंधळामुळे सवलतीच्या दरातली स्टॅम्प्ड्यूटीसुद्धा भरता आली नाही.आता पुढे काय करावे? नक्कलप्रत मिळाली तरी काम भागण्यासारखे आहे.
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
नोंदणी केलेली असल्यास, संदर्भ शोधून प्रत मिळू शकते.
प्रे. नरेंद्र गोळे (बुध., ०३/०२/२०१० - १५:३७).
नोंदणी, वॉर्ड ऑफिस, इ.
प्रे. लतापुष्पा (बुध., ०३/०२/२०१० - १७:३१).
सहमती पत्र
प्रे. पुनेरि जोशि (गुरु., ०४/०२/२०१० - ०५:४०).
सहमतीपत्र
प्रे. लतापुष्पा (शनि., ०६/०२/२०१० - ०६:३६).
"प्रॉपर्टी कार्ड" मिळाल्यास दस्त प्रत काढून मिळू शकेल.
प्रे. नरेंद्र गोळे (शुक्र., ०५/०२/२०१० - ०८:२८).
"प्रॉपर्टी कार्ड" मिळाल्यास दस्त प्रत काढून मिळू शकेल.
प्रे. नरेंद्र गोळे (शुक्र., ०५/०२/२०१० - ०८:२८).
दस्त प्रत इ.
प्रे. लतापुष्पा (शनि., ०६/०२/२०१० - ०६:४८).